22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeक्रीडाभारताचा सर्वांत मोठ्या फरकाने विजय

भारताचा सर्वांत मोठ्या फरकाने विजय

एकमत ऑनलाईन

मुंबई : येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी सर्वात मोठा विजय ३३७ धावांचा होता, जो २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळाला होता. या विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. यापूर्वी कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. मालिका विजयानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संघ आणि युवा खेळाडूंचे कौतुक केले.

सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुस-या डावात १६७ धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला. न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या ६२ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ७ बाद २७६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. या घोषणेसह भारताने न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य दिले. पण पाहुण्यांना हे आव्हान पेलवले नाही. या विजयासह भारताने ही मालिका १-० अशी जिंकली. सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांची कमाई केली. याआधी भारताने २०१५ मध्ये दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३७ धावांनी विजय नोंदवला होता. मयंक अग्रवालला सामनावीर तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

अश्विनचा विक्रम
रवीचंद्रन अश्विनने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक विकेट घेण्यात अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली. या मैदानावर कुंबळे आणि अश्विनने ३८ विकेट घेतल्या. या दोघांनंतर कपिल देव यांनी वानखेडेवर २८ विकेट घेतल्या आहेत. मुंबई कसोटीत अश्विनने आणखी एक विक्रम केले असून, ३०० बळी पूर्ण करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी अनिल कुंबळेने हा करिष्मा केला होता. कुंबळेने भारतीय मैदानांवर ६३ सामन्यांत ३५० विकेट्स घेतल्या असून तो अव्वल स्थानावर आहे.

 

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या