22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeक्रीडाभारताचा सलग दुसरा विजय

भारताचा सलग दुसरा विजय

एकमत ऑनलाईन

हुडाचे शतक, आयर्लंडची अखेरच्या षटकापर्यंत झुंज
डब्लिन : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. भारताने आयर्लंडपुढे विजयासाठी २२६ धावांचे आव्हान ठेवले होते आणि आयर्लंडला विजयासाठी एका चेंडूंत ६ धावांची गरज होती. पण त्यांना एकच धाव काढता आली आणि भारताला चार धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह भारताने ही मालिका २-० अशी जिंकली आहे.

दुस-या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने २२८ धावांचा डोंगर उभारला असला तरी त्यांना आयर्लंडने कडवी लढत दिल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्याने दीपक हुडाला सलामीला पाठवले आणि त्याने सर्वाधिक धावा केल्या. आता दुस-या ट्वेन्टी-२० सामन्यात तर दीपकने वादळी फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दीपकने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले.

त्याचबरोबर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरला. दीपकने यावेळी ५७ चेंडूंत ९ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर १०४ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. दीपकला धडाकेबाज फटकेबाजी करत संजू सॅमसनने सुयोग्य साथ दिली. दीपक आणि संजू यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताला दुस-या ट्वेन्टी-२० सामन्यात आयर्लंडपुढे २२५ धावांचा डोंगर उभारता आला. पण आयर्लंडच्या संघाने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत अखेरच्या षटकांपर्यंत रंगत कायम ठेवली. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली होती. अखेर अवघ्या ४ धावांवर भारताचा विजय झाला.

भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली. दीपक आणि संजू यांची चांगलीच जोडी जमल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी दुस-या विकेटसाठी १७६ धावांची मोठी भागदारी रचली. ही भागीदारी सुरु असतानाच भारतीय संघ या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणार हे स्पष्ट झाले होते. पण संजू बाद झाला आणि ही जोडी फुटली. संजूने या सामन्यात पुनरागमन करताना धमाकेदार फटकेबाजी केली. संजूने यावेळी ४२ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७७ धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळेच भारताला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या