22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeक्रीडाभारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-यावर टांगती तलवार

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-यावर टांगती तलवार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या अशा परिस्थितीत, प्रत्येक बोर्डाने मग ते बीसीसीआय असो किंवा इतर कोणीही असो, त्यांनी भारत सरकारची परवानगी घ्यावी. त्यांच्याकडून अर्ज आल्यावर सरकार निर्णय घेईल, असा आदेश केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी शनिवार दि. २७ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर जाणार आहे. या दौ-याता संघाला कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यामुळे या दौ-यावर टांगती तलवार आहे. जगभरातील सर्व देश दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर आहे. टीम इंडिया डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. मात्र या दौ-याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दौ-याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही : बीसीसीआय
या दौ-याबाबत बीसीसीआयने अपडेट दिले आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौ-याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले आहे. आताच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या संपर्कात आहोत. अशा कठीण काळात, आपण फक्त आशा करू शकतो की गोष्टी नियंत्रणात असतील.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या