19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeक्रीडाभारताच्या पराभवाने बदलली वर्ल्ड कपची समीकरणे

भारताच्या पराभवाने बदलली वर्ल्ड कपची समीकरणे

एकमत ऑनलाईन

पर्थ : टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत असताना लिंबूटिंबू संघांनी बलाढ्य संघांना मैदानात पाणी पाजले. झिम्बाब्वेने पाकिस्तानला नामोहरम करीत उलटफेर घडविल्यानंतर रविवारी भारताच्या पराभवाने वर्ल्ड कपच्या समिकरणांचा नूरच पालटला. आज झिम्बाब्वेचा संघ चुरशीच्या लढतीत बांग्लादेशकडून पराभूत झाला. त्यानंतर दक्षिण अफ्रेकेशी झुंज देताना फलंदाजीत सुरुवातीलाच अडखळलेल्या भारतीय संघाचे ढिसाळ क्षेत्ररक्षण पराभवाला कारण ठरले. त्यामुळे भारताच्या पराभवाने वर्ल्ड कपच्या समिकरणांमध्येही आता उलटफेर झाले आहेत.
बांग्लादेशच्या विजयामुळे गट २ ओपन झाला आहे. उपांत्य फेरीची लढाई आणखी कठीण झाली आहे. झिम्बाब्वेवरील विजयानंतर आता बांग्लादेश गुणतालिकेत दुस-या स्थानावर आला आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली. या गटात भारत अव्वल होता. मात्र आजच्या पराभवामुळे तो तिस-या स्थानी लोटला गेला. आता यात दक्षिण आफ्रिका पहिल्यासाठी पोचला आहे. त्यामुळे भारतासाठी पुढची वाट आणखी खडतर झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेनंतर भारताचा सामना बांग्लादेश आणि झिम्बाब्वेशी होणार आहे. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर भारताला हे दोन्ही सामने खिशात घालावे लागणार आहेत.
काय सांगते गुणांचे गणित
भारत दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यास भारताचे ३ सामन्यांत २ विजय, एका पराजयासह ४ गुण होतील. उर्वरित दोन सामने जिंकल्यास भारताचे ८ गुण होतील आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. मात्र या दोनपैकी एकही सामना गमावल्यास भारताची उपांत्य फेरीची वाट खडतर होईल.
बांग्लादेशचे अद्याप २ सामने शिल्लक आहेत. त्यांना भारत आणि पाकिस्तानचा सामना करायचा आहे. बांग्लादेशने हे दोन्ही सामने जिंकले तर तो उपांत्य फेरी गाठेल. मात्र एक सामना गमावल्यास बांग्लादेशचे ६ गुण होतील आणि मग सगळा खेळ नेट रनरेटवर अवलंबून असेल.
——-

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या