Sunday, September 24, 2023

भारतातील रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे-पंतप्रधान

नवी दिल्ली : भारतात करोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. डॉ.जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, या वर्षाच्या सुरूवातीस, काही लोकांचा अंदाज होता की भारतात करोना विषाणूचा परिणाम खूप तीव्र होईल. परंतु, लॉकडाउन, सरकारने घेतलेले अनेक पुढाकार आणि जनतेचा लढा या कारणास्तव भारतात इतर देशांपेक्षा चांगली स्थिती आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच, दिल्लीतील आरामदायी सरकारी कार्यालयांमधून नव्हे तर लोकांच्या अभिप्रायानंतर आम्ही निर्णय घेतले आहेत, असेही मोदींनी सांगितले.कोणाचीही मृत्यू होणे ही दुर्देवी बाब आहे. देशात एक दशलक्ष लोकसंख्येमागे १२ मृत्यूंची नोंद आहे. तर इटलीमध्ये हाच दर एक दशलक्ष लोकसंख्येमागे ५०० इतका आहे. लोकांच्या सहकार्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. आता आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्यासारखे प्रकार आपल्याला करायला हवे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Read More  भारतातून चीनमध्ये निर्यात होणाऱ्या सामानाचे कंटेनर चीनने अडवून ठेवले

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या