26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेत संतापाची लाट

श्रीलंकेत संतापाची लाट

एकमत ऑनलाईन

राष्ट्रपतींनी पाठविला ई-मेलद्वारे राजीनामा
कोलंबो : श्रीलंकेतून पळ काढलेल्या राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी मालदीवमधून सिंगापूरला पलायन केले आहे. राष्ट्रपती विदेशात पळून गेल्याने श्रीलंकेत संतापाची लाट उसळली असून, जोरदार निदर्शने सुरू आहेत. यामुळे संसद भवनाच्या सुरक्षेसाठी रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती भवन व पंतप्रधान निवासस्थान खाली केले आहे. या दोन्ही इमारती आता लष्कराने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष गोटबाया यांनी थेट सिंगापूर येथून ई-मेलद्वारे आज आपला राजीनामा पाठवून दिला. गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनामाचे पत्र प्राप्त झाल्याचे श्रीलंकन अध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले आहे.

राजपक्षेंनी बुधवारी रात्री मालदीवच्या व्हेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंगापूरला पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण मालदीवमधील लंकन नागरिकांच्या निदर्शनांमुळे त्यांना आपले विमान गाठता आले नाही. आंदोलकांनी राजपक्षेंना आल्यापावली श्रीलंकेला माघारी पाठवण्याची मागणी केली होती. मात्र, ते आज सिंगापुरात दाखल झाले. गोटबाया मंगळवारी रात्री कोलंबोहून मालदीवला पोहोचले होते.

राजपक्षेंनी देश सोडल्यामुळे श्रीलंकेत संतापाची लाट पसरली आहे. राजधानी कोलंबोच्या रस्त्यांवर निदर्शकांनी धूडगूस घातला आहे. जनतेची निदर्शने पाहता लष्कराने आपल्या नागरिकांपुढे शस्त्रे खाली टाकली आहेत. जमावाला पांगवण्यासाठी ते केवळ अश्रुधूराच्या नळकांड्या व सौम्य बळ प्रयोगाचा वापर करत आहेत. निदर्शनात आतापर्यंत १ जण ठार, तर ७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या