26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडाभारताने मालिका जिंकली

भारताने मालिका जिंकली

एकमत ऑनलाईन

दुसºया ट्ेंटी-२० सामन्यातही दणदणीत विजय
रांची : लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसºया ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करीत भारतापुढे विजयासाठी १५४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुल-रोहित जोडीपुढे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लोटांगण घालावे लागले. त्यामुळे भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला. लोकेश राहुलने यावेळी ४९ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांसह ६५ धावांची खेळी साकारली. रोहितने यावेळी ३६ चेंडूंत एक चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५५ धावांची धडेकाबीज खेळी केली. या दोघांनीही या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. त्यात सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाला. मात्र, व्यंकटेश अय्यर आणि रुषभ पंत या जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यापूर्वी न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात केली. खासकरून मार्टिन गप्तिलने यावेळी भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. गप्तिलने पहिल्या दोन्ही चेंडूवर चौकार लगावत संघाला भन्नाट सुरुवात करून दिली. गप्तिलला ८ धावांवर असताना जीवदान मिळाले. या जीवदानाचा चांगलाच फायदा गप्तिलने उचलला आणि भारतीय गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. त्याने फक्त १५ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३१ धावांची खेळी साकारली आणि संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. गप्तिल बाद झाल्यावर न्यूझीलंडचा दुसरा सलामीवीर डॅरिल मिचेल (३१) आणि मार्क चॅम्पमन (२१) यांनाही मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. भारताकडून यावेळी पदार्पण करणाºया हर्षलने मिचेलला बाद करत आपली पहिली विकेट मिळवली. भारताने न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही आणि त्यामुळेच भारताला त्यांच्या धावसंख्येला वेसण घालता आली.
रोहितचा विक्रम
रोहितने आज ५५ धावांची दमदार खेळी साकारली. यावेळी त्याने पाच चौकार लगावले आणि इतिहास रचला. रोहितने जेव्हा पहिला षटकार लगावला, तेव्हा ४५० षटकारांचा टप्पा त्याने पूर्ण केला होता. याआधी ४५० षटकारांचा टप्पा पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने पार केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या