मुंबई : भारतीय लोक अतिशय स्वाभिमानी असल्याचे वक्तव्य केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्याच देशातून टिकेला सामोरे जावे लागत आहे. भारतीयांबद्दल एवढी आपुलकी असेल तर इम्रान यांनी पाकिस्तान सोडून तेथेच राहायला जावे, असा सल्ला पाकिस्तानच्या विरोधी पक्षनेता मरियम नवाझ यांनी इम्रान यांना दिला आहे.
भारतीय हे खुद्दार कौम (अतिशय स्वाभिमानी लोक) आहेत.
कोणतीही महासत्ता भारतावर अटी घालू शकत नाही. मी निराश आहे की केवळ आरएसएसच्या विचारसरणीमुळे आणि काश्मीरशी जे केले जात आहे, त्यामुळे आमचे चांगले संबंध नाहीत,असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याने म्हटले होते. भारत आणि पाकिस्तान सोबत स्वतंत्र झाले. भारताला मी इतरांपेक्षा नीट ओळखतो. तिथं माझे मित्र आहेत. क्रिकेटमुळे मला भारतीयांकडून प्रेम मिळाले. आरएसएस तत्त्वज्ञान आणि काश्मीर प्रश्नामुळे आपले संबंध बिघडले आहेत.