27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयसिमेंट कंपनी होल्कीम देश सोडून जाणार

सिमेंट कंपनी होल्कीम देश सोडून जाणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिमेंटचा वापर केला जातो. याचबरोबर देशभरात रोड डेव्हलपमेंटची कामे ही जोरदार सुरू आहेत. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे सुरू असताना अचानक एसीसी आणि अंबुजा सिमेंट निर्मिती करणारी कंपनी होल्कीम ग्रुप भारत सोडून जाणार आहे.

भारतातील १७ वर्षांत उभारलेला पसारा आवरण्याची तयारी होल्कीमने सुरू केली आहे. या कंपनीने कोअर मार्केटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ग्लोबल स्ट्रॅटेजी तयार केली आहे. यानुसार भारतातून बाहेर पडणे हे या धोरणाचाच भाग आहे. होल्कीम ग्रुपकडून अंबुजा आणि एसीसी या भारतातील लिस्टेड कंपन्या विक्रीला काढल्या आहेत. होल्कीम ग्रुपकडून जेएसडब्ल्यू आणि अदानी ग्रुपसह अन्य कंपन्यांशी चर्चा करत आहे. जेएसडब्ल्यू आणि अदानी यांनी काही काळापूर्वीच सिमेंट उद्योगात एन्ट्री केली आहे. दोन्ही उद्योग समुहांनी या उद्योगात मोठी झेप घेण्याची तयारी केली आहे.

अल्ट्राटेक नंबर वन
सध्या भारतात आदित्य बिर्ला यांची अल्ट्राटेक कंपनी एक नंबरवर आहे. त्यांचे वर्षाला ११७ दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन होत असल्याची माहिती आहे, तर एसीसी आणि अंबुजा या कंपन्याकडून ६६ दशलक्ष टन आहे. दरम्यान ज्यांच्याकडे याची मालमत्ता जाईल, त्यांना याची मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

लॅफर्झ होल्कीम सर्वांत मोठी कंपनी
होल्कीम ही मूळची स्वित्झर्लंडमधील कंपनी आहे. त्यांचा मूळ व्यवसाय हा सिमेंटचा आहे. दरम्यान या कंपनीला फ्रान्सच्या एका मोठ्या कंपनीने विकत घेतले आणि विलीनीकरण केले. यामुळे या कंपनीचे नाव लॅफर्ज होल्कीम असे झाले आहे. यामुळे ही जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या