29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय वंशाचा नेता होणार ब्रिटनचा पंतप्रधान?

भारतीय वंशाचा नेता होणार ब्रिटनचा पंतप्रधान?

एकमत ऑनलाईन

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सन २०२० मध्ये देशात कोरोना निर्बंध लागू केलेले असताना त्यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये आपल्या कार्यालयामधील कर्मचा-यांसोबत पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसत आहे. विरोधी पक्षाने पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान ब्रिटनमधील एक प्रमुख सट्टा कंपनी असणा-या बेटफेअरने केलेल्या दाव्यानुसार या नवीन वादात अडकलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर भारतीय वंशाचे मंत्री ऋषि सुनक यांची वर्णी पंतप्रधानपदी लागू शकते.

बेटफेअरने दिलेल्या माहितीनुसार मे २०२० मध्ये कोरोना लॉकडाउनच्या कालावधीत पंतप्रधान कार्यालयातील डाउनिंग स्ट्रीटमध्ये झालेल्या ड्रिंक पार्टीसंदर्भात समोर आल्लेल्या माहितीनंतर बोरिस जॉन्सन अडचणीत आलेत. ५७ वर्षीय बोरिस जॉन्सन यांना विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षीय नेत्यांकडूनही विरोध केला जात आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना पंतप्रधान केले जाऊ शकते, अशा चर्चा ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या