26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडाभारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार?

भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक स्पर्धांची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली. पुढील १० वर्षांत जगभरामध्ये कुठे-कुठे आणि कोणत्या स्पर्धा भरवल्या जाणार याची माहिती आयसीसीने जाहीर केली. यामधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानमध्येही क्रिकेट स्पर्धांचं आयोजन होणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र अनेक संघ पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार की नाहीत यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.

अनेकांचे लक्ष भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार का?, याकडे लागले आहे. दरम्यान, आयसीसीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान जगभरातील संघ क्रिकेट खेळण्यासाठी तेथे जातील की नाही यावर, आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले, ‘‘होय, आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की सर्व संघ पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळतील.’’ ग्रेग बार्कले म्हणाले की, ‘‘मला आशा आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध क्रिकेटच्या माध्यमातून सुधारू शकतात.’’

यापूर्वी न्यूझिलंड आणि इंग्लंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना ग्रेग बार्कले म्हणाले, ‘‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काय घडले याने काही फरक पडत नाही. जर आम्हाला पाकिस्तानमध्ये आयसीसी कार्यक्रम आयोजित करण्याचा आत्मविश्वास नसता तर आम्ही ते केले नसते. पाकिस्तानला ब-याच काळानंतर ही एक संधी असेल’’ असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या