22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeक्रीडाभाविना पटेलने पटकावले सुवर्णपदक

भाविना पटेलने पटकावले सुवर्णपदक

एकमत ऑनलाईन

पॅरा टेबल टेनिसपटूची महिला एकेरीत सुवर्ण कामगिरी
बर्मिंगहॅम : भारतीय खेळाडू आज कॉमनवेल्थ स्पर्धेत अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहेत. कुस्तीत तीन सुवर्णपदके मिळवल्यानंतर भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने आणखी एक गोल्ड मेडल जिंकून दिले आहे. तिने पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरीत (वर्ग ३-५) हे पदक मिळवले आहे.

भाविनाने फायनलमध्ये नायजेरियाच्या ईफेचुकवुडे ख्रिस्तिना ईकपेयुई हिला १२-१०, ११-२ आणि ११-९ अशा तीन सेट्समध्ये मात देत सामना जिंकला. याआधी भाविनाने उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडच्या सू बेलीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवत पदक निश्चित केले होते. भाविनाने जिंकलेल्या या पदकामुळे भारताची सुवर्णपदकांची संख्या १३ झाली आहे.

भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू
भाविना पटेल सर्वात आधी २०११ च्या थायलंड टेबल टेनिस चॅम्पियनशिपमधून प्रकाशझोतात आली. पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत तिने त्यावेळी सुवर्णपदक पटकावले. नंतर २०१३ मध्ये आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीतही रौप्य पदक जिंकले. ती इथेच थांबली नाही. यानंतर तिने २०१७ मध्ये आशियाई पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पुन्हा एकदा कांस्यपदकाला गवसणी घातली. मागील वर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्येही तिने कमाल कामगिरी करत थेट रौप्यपदक मिळवले. हे तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश होते. आता राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सर्वोच्च कामगिरी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या