19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रभास्कर जाधव यांना पोलिसांकडून नोटीस

भास्कर जाधव यांना पोलिसांकडून नोटीस

एकमत ऑनलाईन

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस आली आहे. याप्रकरणी भाजपने तक्रार दाखल केली होती. यानंतर भास्कर जाधव यांच्या घरी जाऊन पोलिसांनी अटकेसंदर्भातील नोटीस बजावली आहे. भास्कर जाधव यांनी कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अपमानकारक आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत्ती संदर्भात विवरण आणि तपासाला सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली होती. याविरोधात महाविकास आघाडीने कुडाळमध्ये काढलेल्या मोर्चाच्या सभेत गुहागरचे आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल जनमानसात बदनामी अब्रुनुकसानीकारक तसेच प्रक्षोभक, चिथावणी देणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता कुडाळ पोलिसांनी अटकेसंदर्भातील भास्कर जाधव यांना नोटीस बजावली आहे.

१८ ऑक्टोबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांनी आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू केल्याचे कारण पुढे करत एसीबी कार्यालयावर मोर्चा काढला होता. सभेचे आयोजन करून त्या सभेत आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल बदनामीकारक तसेच प्रक्षोभक, चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. यासंदर्भात भाजपने कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या