36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रभिडे यांच्यासह तिघांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

भिडे यांच्यासह तिघांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

एकमत ऑनलाईन

सांगली : जोधा अकबर चित्रपटावरून सांगलीत २००८ साली दंगल झाली होती. या दंगलीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंसह ३ जणांचा अजामिनपात्र वॉरंट कोर्टाने रद्द केला. या प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह संशयित ९० आरोपी सुनावणीसाठी सांगली न्यायालयात हजर होते.

या दंगलप्रकरणी एकूण ९४ जणांवर गुन्हा दाखल आहे. जोधा अकबर चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध आणि त्यांनतर पोलिसांनी आंदोलकांना अटक केल्याने सांगलीत तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्यावेळी सांगलीत संचारबंदी लागू केली होती.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या