ठाणे : ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी परिसरात एका वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली. घरात फक्त हे दोघेच राहत होते. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेक-यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील अकलोली परिसरातील पेंढारपाडा येथे एका घरात वृद्ध पती-पत्नी राहत होते. त्या दोघांचीही धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. जगन्नाथ (बाळा) पाटील (८३) आणि सत्यभामा पाटील (७५) अशी दोघांची नावे आहेत.