36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeउस्मानाबादभीषण अपघातात ४ ठार

भीषण अपघातात ४ ठार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कार व कंटेनरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील एकाच कुटुंबातील चौघेजण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि. ३१) सकाळी सातच्या सुमारास उस्मानाबाद-ढोकी राज्य मार्गावर भडाचीवाडी गावाजवळ घडला. मयत झालेले चौघे जण लातूर शहरातील एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.

लातूर येथील पाडे कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी उस्मानाबादला आले होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुटुंबीय शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास कारने उस्मानाबादहून लातूरला निघाले होते. त्यावेळी उस्मानाबाद-ढोकी राज्य मार्गावर भडाचीवाडी गावाजवळ त्यांची कार (एमएच २४ एए ८०५५) समोरून येणा-या कंटेनरला (एमएच ०४ एफबी २०५५) धडकली. या अपघातात कारमधील हिरकणाबाई मुरलीधर पाडे (७०), उमेश मुरलीधर पाडे (५०), सविता उमेश पाडे (४५), प्रतिक उमेश पाडे (२३) हे एकाच कुटुंबातील चौघेजण जागीच ठार झाले.
हा अपघात इतका भीषण होता की, कार कंटेनरला समोरून धडकली.

त्यामुळे कारचा पुढचा भाग कंटेनरच्या खाली गेल्याने कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती समजताच उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक फौजदार श्रीशैल्य कट्टे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने व क्रेनच्या सहाय्याने कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले. येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या अपघाताची उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या