26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयभोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

एकमत ऑनलाईन

भोपाळ : भोपाळमध्ये काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर घेराव घालण्याचा इरादा केला होता. मात्र त्यादरम्यान दगडफेक होऊन मोठा गोंधळ झाल्याने पोलिसांनी एनएसयूआय कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याची घटना गुरूवार दि. २५ नोव्हेंबर रोजी येथे घडली.

शिक्षण वाचवा, देश वाचवा मोहिमेंतर्गत भोपाळमध्ये एनएसयूआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस कार्यालयात बैठक सुरू होती. बैठकीला माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील उपस्थित होते. दरम्यान, एनएसयूआयचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा घेराव घालण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा गोंधळ होऊन पोलिसांनी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. मध्य प्रदेश सरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्विकारणार असल्याने त्या विरोधात काँग्रेसच्या युवा नेत्यांनी पक्ष कार्यालय ते मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला होता. त्यात दगडफेकीच्या घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्राने गेल्या वर्षी जाहीर केलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्य प्रदेश सरकार स्विकारणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेचा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापर करण्यावर भर दिला आहे. मातृभाषेमुळे विद्यार्थ्यांना क्लिष्ट संकल्पना सहज समजू शकते म्हणून स्थानिक भाषा इयत्ता आठवीपर्यंत प्राधान्याने वापरली जाईल. नवीन धोरणानुसार, पारंपारिक १०+२ शालेय अभ्यासक्रमाची रचना अनुक्रमे ३-८, ८-११, ११-१४ आणि १४-१८ वर्षे वयोगटातील ५+३+३+४ रचनेने बदलली जाणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या