एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम आणि जळगाव जिल्ह्यातील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील आज रात्री गुवाहाटी दाखल झाले.
यावेळी त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे दर्शनही घेतले. त्यांचे हे फोटोही दूरचित्रावाणीवर दिसून आले. यासोबतच मुंबईचे आणखी २ आमदार आणि अन्य दोघे थेट एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील ३ आमदार शिंदेंसोबत गेले आहेत. शिवसेनेचे जिल्ह्यात ४ आमदार आहेत. यात पाचो-याचे आमदार किशोर पाटील, चोपड्याच्या आमदार लता सोनवणे, धरणगावचे गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे.