नांदेड/मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दुस-यांदा कोरोनाची लागणी झाली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मंत्रिमहोदयांना मिळाली.
त्यानंतर अशोक चव्हाण तात्काळ बैठक सोडून बाहेर पडले. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतल्या उपस्थितीने इतर मंत्र्यांची चिंता वाढली आहे. राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा होण्याचे सत्र सुरूच असून, अशोक चव्हाण यांना दुस-यांदा कोरोनाची लागण झाली होती.