वाराणसी : काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी आयुक्त नेमण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नियुक्त आयुक्त १९ एप्रिल रोजी मंदिर-मशीद परिसराला भेट देणार असून व्हीडीओग्राफीही करणार आहेत.
दरम्यान, न्यायालयाने मंदिर, मशिदी परिसरात सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याने न्यायालयाकडून परिसराची तपासणी, रडार अभ्यास आणि व्हीडीओग्राफीसाठी आदेश द्यावेत, अशी विनंती केली होती. वाराणसी जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर २०२० मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला.