18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeआंतरराष्ट्रीयमक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

एकमत ऑनलाईन

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताची मागणी मंजूर
संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने भारताच्या अत्यंत महत्त्वाच्यÞा मागणीला मंजुरी दिली. हाफीज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. खरे तर गेल्याचवर्षी भारताने मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी चीनने नकाराधिकार वापरत त्यात खोडा घातला होता. पण यावेळी भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त मागणीसमोर चीनलाही नमते घ्यावे लागले आणि लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल मक्की जागतिक दहशतवादी म्हणून घोषित झाला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. यूएनएससीने आयएसआयएल अब्दुल रहमान मक्की हा दहशतवादी हाफीज सईदचा मेहुणा आहे. जगभरातल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या या क्रुरकर्म्याला आता युनायटेड नेशन्सने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

अब्दुल रहमान मक्की सध्या दहशतवादासाठी निधी उभारण्यात व्यस्त होता. तरुणांना दहशतवादी बनवण्याच्या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. भारतात विशेषत: जम्मू आणि काश्मिरात तो हल्ल्यांची योजना आखत होता. युनायटेड नेशन्सने जाागतिक दहशतवादी घोषित केल्यामुळे

अब्दुल मक्कीवर काय कारवाई होणार?
मक्कीची जगभरातली मालमत्ता आणि संपत्ती गोठवली जाईल. या कारवाईमुळे मक्कीच्या प्रवासावर आता बंदी येणार आहे. मक्की यापुढे त्याच्या मालकीचे पैसे वापरु शकणार नाही. या कारवाईमुळे मक्कीला शस्त्रास्त्रांची खरेदीही करता येणार नाही. सोबतच अधिकार क्षेत्राबाहेर त्याच्या प्रवासावर गदा आली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या