26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeमहाराष्ट्रमध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

एकमत ऑनलाईन

मुंबई : ऐन हिवाळ््यात गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रबी पिकांची हानी झाली. असे असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. पुढील २४ तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने आज मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या