18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeलातूरमनरेगा अंतर्गत फळबाग ंलागवड कार्यक्रमास मुदतवाढ

मनरेगा अंतर्गत फळबाग ंलागवड कार्यक्रमास मुदतवाढ

एकमत ऑनलाईन

औसा : औसा मतदारसंघात फळबाग लागवडीतून शेतक-यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांनी १७ नोव्हेंबरला कृषी विभागाच्या बैठकीत योजनेसाठी मुदतवाढीची विनंती केली होती. त्यानुसार आमदार पवार यांनी रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्याशी फोनवर चर्चा करुन मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती केली होती. यानुसार मनरेगा अंतर्गत बांधावर व शेतात फळबाग लागवड कार्यक्रमास ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सध्या औसा तालुक्यातील २ हजार ८०० शेतक-यानी २ हजार ५०० हेक्टरवर मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये तालुक्यात प्रत्यक्ष ४०० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. तर मार्च अखेरीस २ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट आहे. तर औसा विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील ६८ गावात मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठी ३०० हेक्टरची मागणी असून ४४ हेक्टर ५ एक्करवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. मार्चपर्यंत ६० हेक्टरवर आणखी फळबाग लागवड केली जाणार आहे.

या योजनेसाठी शेतक-यांकडून मोठी मागणी असताना कृषी विभागाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे थोड्या तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या अनुषंगाने या योजनेला मुदतवाढ मिळणे आवश्यक होते. या योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे फळबाग लागवडीला गती मिळणार
आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या