24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रमनसेकडून उद्धव ठाकरेंचे वडीलही ‘हायजॅक’?

मनसेकडून उद्धव ठाकरेंचे वडीलही ‘हायजॅक’?

एकमत ऑनलाईन

मुंबई : बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना मनसेने शिवसेना भवनावर दगडफेक केली, त्यांना यातना दिल्या. आता हीच मनसे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राजकारण करू पाहत आहे. मनसे आजपर्यंत बाकी सगळे हायजॅक करतच आली आहे, आता तुम्ही उद्धव ठाकरे यांचे वडीलही हायजॅक करणार का?, अशा खोचक शब्दांत शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला. त्या शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करणा-या मनसेचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेना भवनाला टार्गेट केल्याशिवाय किंवा शिवसेनेवर कुरघोडी केल्याशिवाय मनसेला टीआरपी मिळत नाही. आता मनसेचे नेते आम्ही ‘बी टीम’ म्हणजे बाळासाहेबांची टीम असल्याचे सांगत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत. त्यामुळे आता मनसे त्यांनाही हायजॅक करणार का? शेवटी मनसेला बाळासाहेब ठाकरे यांचा आधार घ्यावाच लागला, अशी टिप्पणी किशोरी पेडणेकर यांनी केली. तसेच शिवसेनेचे हिंदुत्व हे आजही प्रखर आहे.

आम्ही भूमिका बदलल्या असतील पण तुमच्याप्रमाणे स्वार्थ साधण्यासाठी काहीही केलेले नाही. मित्र जेव्हा मित्र रहात नाही आणि समोरून मदतीचा हात पुढे आला तर तो पकडायचा असतो. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर एका मुस्लिम व्यक्तीला नमाज अदा करू दिली होती. बाळासाहेब ठाकरे मुस्लिमांविषयी इतके उदारमतवादी होते. त्यामुळे मनसेने उगाच कोणाची तरी भूमिका घेऊन बोलू नये, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या