29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रममता बॅनर्जी यांच्या विरोधात मुंबईत तक्रार

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मुंबईत तक्रार

एकमत ऑनलाईन

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौ-यावर आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी सुरू झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता भाजपच्या मुंबईतील नेत्याने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप ममता बॅनर्जींवर केला आहे. ममता बॅनर्जी यांनी खाली बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. तसेच राष्ट्रगीत सुरू असताना त्या मध्येच थांबल्या. त्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान होतो, असे भाजप नेत्याने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई पोलिसांत ही तक्रार दाखल केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या