26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयममता बॅनर्जी यांनी घेतली मोदींची भेट

ममता बॅनर्जी यांनी घेतली मोदींची भेट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत असून, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बीएसएफच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. बीएसएफ आमचे शत्रू नाहीत. आम्ही त्यांचा सन्मान करतो. परंतु कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा राज्याचा विषय आहे.

त्यामुळे निष्कारण संघर्ष होत आहे. संघराज्याची जी रचना आहे. त्याला विनाकारण धक्का देणे योग्य नाही. त्यामुळे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे आणि बीएसएफ कायदा मागे घ्यावा, असे बॅनर्जी म्हणाल्या. बीएसएफला या अगोदर १५ कि.मी. पर्यंत कारवाईचा अधिकार होता. आता त्याची मर्यादा ५० कि.मी.पर्यंत वाढविली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या