26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeनांदेडमराठवाड्याचे सुपुत्र झारखंडचे अपर पोलिस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक

मराठवाड्याचे सुपुत्र झारखंडचे अपर पोलिस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक

एकमत ऑनलाईन

नांदेड : भारतीय पोलिस सेवा १९९५ बॅचचे झारखंड राज्यात कार्यरत अपर पोलिस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था) संजय आनंदराव लाठकर यांना प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येस उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. सदरील प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान हा देशातील पोलिस दलातील निवडक अधिका-यांना दिला जातो. लाटकर हे नांदेडचे भूमिपुत्र आहेत.

लाठकर यांनी भारतीय पोलिस सेवेत गेली २६ वर्ष देशातील बिहार, झारखण्ड, महाराष्ट्र राज्य व सीआरपीएफमध्ये सेवा बजावली आहे. या दरम्यान, विविध पदांवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी ८ विभिन्न पदके देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक, २ वेळा आंतरिक सुरक्षा पदक, मुख्यमंत्री झारखंड यांचे शौर्य पदक, राष्ट्रपती यांच्याद्वारे घोषित गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक व केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक इत्यादींचा समावेश आहे. बिहार व झारखंड राज्य सरकारद्वारा त्यांना यापूर्वी अनेक प्रसंगी पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सीआरपीएफमध्ये गडचिरोली व नागपूर येथे डीआयजी तसेच रांची व मुंबई येथे आयजीपी म्हणून नक्षलविरोधी मोहिमेत बजाविलेल्या उत्कृष्ट कामगिरी व प्रशासनासाठी ११ डीजी, सीआरपीएफ प्रशंसा डिस्क देण्यात आलेली आहेत. तसेच लाठकर यांना आतापर्यंत ६० पेक्षा अधिक प्रशस्तिपत्रेही मिळालेली आहेत.

परभणी आणि लातूरात बजावले कर्तव्य
महाराष्ट्रात लाठकर यांनी परभणी व लातूर या जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक, पुणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी अशा महत्वपुर्ण पदांवर कार्य केलेले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाने २ वेळा सन्मान पत्र व राज्य अल्पसंख्याक आयोगाने महात्मा गांधी शांतता पुरस्कार देवून गौरविलेले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या