23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमराठवाडामराठवाड्यातील धरणांत पाणीसाठा ४० टक्क्यांवर

मराठवाड्यातील धरणांत पाणीसाठा ४० टक्क्यांवर

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : गेल्या महिन्याभरातील उन्हाचा पारा वाढताना पाहायला मिळाला. यामुळे झालेल्या बाष्पीभवनाचा फटका मराठवाड्यातील छोट्या-मोठ्या जलप्रकल्पांना बसला आहे. धरणांतील पाणीपातळी ५१ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे महिन्याभरात ११ टक्के पाण्याची घट झाली आहे. अनेक भागात पाणी टंचाई जाणवत आहे, तर गेल्या वर्षांच्या तुलनेत सुमारे १६ टक्क्यांनी प्रकल्पांतील पाणी कमी झाले आहे.

मराठवाड्यात गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाला. अखेरच्या क्षणीदेखील चांगला पाऊस झाल्याने जवळपास सर्वच धरणे आणि छोटे-मोठे प्रकल्प तुडुंब भरले होते. त्यामुळे यंदा कुठेही पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असे सांगण्यात आले. खरोखरच उन्हाळ््यातदेखील ब-याच ठिकाणच्या प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा होता. मात्र, मार्च महिन्यापासून सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली. त्यामुळे पाण्याचे बाष्पिभवन मोठ्या प्रमाणात होत गेले. त्यातून प्रकल्पांतील पाणीसाठा हळूहळू कमी होत गेला. मराठवाड्यातील पाणीसाठ्यात उन्हाळ््यात बरीच घट झाली आहे. मागच्या एक महिन्याचा विचार केल्यास तब्बल ११ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. अर्थात कडक उन्हामुळे मराठवाड्यातील सर्वच प्रकल्पांना याचा फटका बसला असून, पाणी ब-याच प्रमाणात कमी झाले आहे.

मराठवाडा विभागात एकूण ७४९ लघु प्रकल्पांपैकी ६ हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, ५५ प्रकल्प सध्या जोत्याखाली आले आहेत. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात ४७.८७ टक्के पाणीसाठा आहे. तसेच ७५ मध्यम प्रकल्पात ३३.०२ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात २२.६२ टक्के, गोदावरीवरील १५ प्रकल्पात ३७.४१ टक्के, इतर बंधारे २५ प्रकल्पांत ६९.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अजूनही जवळपास सर्वच प्रकल्पांत बराच पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु कडक उन्हामुळे बाष्पिभवन होऊन हा साठा वरचेवर कमी होत आहे.

जायकवाडीत ४३ टक्के पाणी
आशिया खंडातील सर्वात मोठे मातीच धरण समजल्या जाणा-या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ५६ टक्क्यांवरून ४३ टक्क्यांवर आला आहे. ज्यात १.२३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

मध्यम प्रकल्पांतील
पाणीसाठा ३३ टक्क्यांवर
मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा ४५ वरून ३३ टक्क्यांवर आला आहे. लघु प्रकल्पांत पाणीसाठी ३१ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आला आहे, तर गोदावरी बंधा-यात ४७ वरून ३७ टक्के आणि इतर बंधा-यांत ८९ वरून ६९ वर जलसाठा आला आहे. यावरून पाणीसाठ्यात किती घट झाली, याचा अंदाज येतो.

पाणी टंचाईमुळे ४३ गावे,
२३ वाड्यांना टँकरद्वारे पाणी
मराठवाड्यातील जलसाठ्यात पाणी कमी होत असताना विभागात पाणी टंचाईसुद्धा जाणवत आहे. मराठवाड्यात ४३ गाव आणि २३ वाड्यांवर एकूण ५९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात १६ शासकीय आणि ४३ खाजगी टँकरचा समावेश आहे.

सर्वाधिक टँकर जालना जिल्ह्यात
सर्वाधिक २५ टँकर जालना जिल्ह्यात सुरू आहेत, तर हिंगोली जिल्ह्यात १९, नांदेड १०, बीड ३, औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी १ टँकर सुरु आहे. अनेक ठिकाणी टँकरची मागणी करण्यात आली असून प्रस्ताव प्रलंबित आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या