22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात पुन्हा संततधार

मराठवाड्यात पुन्हा संततधार

एकमत ऑनलाईन

दोन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही, कोवळ््या पिकांवर संकट
औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात मागच्या दोन दिवसांपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे. पावसाचा जोर अधिक नसला, तरी अगोदरच सलग चार ते पाच दिवस दमदार पाऊस झाला. तसेच अतिवृष्टीने पिके, शेतजमिनीची हानी झाली.

त्यानंतर तीन दिवस पावसाने उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे अगोदरच कोवळी पिके पिवळी पडलेली असताना पावसाच्या रिपरिपमुळे कोवळी पिके धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. लातूर जिल्ह्यासह ब-याच भागात उघडिपीदरम्यान बरीच पेरणी झाली आहे. त्यामुळे उशिरा पेरणी झालेल्या पिकांची उगवणच धोक्यात येऊ शकते.

विदर्भात मुसळधार
विदर्भात शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने वर्ध्यासह चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात पुराच्या तडाख्यात अनेक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे शेतीपिके संकटात सापडली आहेत. अगोदरच विदर्भाला मुसळधार पावसामुळे पुराचा तडाखा बसला होता. त्यामुळे विदर्भात पिकांची हानी झाली आहे. त्यातच शुक्रवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली असून, या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या