22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रमराठा सेवा संघात युतीनंतर फेरबदल

मराठा सेवा संघात युतीनंतर फेरबदल

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीची राज्यभरात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांनी या नव्या युती आणि समीकरणावर टीका केली आहे. शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबतची युती किती यशस्वी होते, हे येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान, युतीनंतर फेरबदल करण्यात आले आहेत.

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर फेरबदल करण्यात आले आहेत. २०२४ च्या निवडणुकीचे लक्ष्य समोर ठेवून मराठा सेवा संघाने नवी रणनीती आखली आहे. मराठा सेवा संघाची जबाबदारी आता तरुण कर्मचा-यांकडे देण्यात आली आहे. केवळ ३० टक्के जुने पदाधिकारी पदावर ठेवण्यात आले आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संभाजी ब्रिगेडशी झालेली युती निश्चितच राज्याच्या राजकारणाला वळण देणारी ठरेल. एकीकडे राज्यात शिवसेनेला खिंडार पडलेले असतानाच शिवसेना व संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्याचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षांत उमटली आहे.

महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे. या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवतील, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या