24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयमला उलटी येते, हे संस्कारी लोक आहेत का?

मला उलटी येते, हे संस्कारी लोक आहेत का?

एकमत ऑनलाईन

  बिल्किस बानोसाठी शबाना आझमींना कोसळले रडू

नवी दिल्ली : बिल्किस बानोच्या दोषींच्या सुटकेविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात सहभागी झालेल्या माजी खासदार आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी दोषींच्या सुटकेचा तीव्र निषेध केला आहे. काही विद्यार्थी आणि महिलांच्या गटांसह शनिवारी जंतरमंतर इथे या निर्णयाचा विरोध केला.

तर ‘‘मला उलटी येते. हे संस्कारी लोक आहेत का? आणि सत्तेत असलेला व्यक्ती अशी टिप्पणी करत आहे’’, असे त्या म्हणाल्या. शबाना आझमी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रतिक्रियेचा व्हीडीओ पोस्ट केला आहे. त्याचसोबत नेटक-यांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

‘‘गुजरात सरकारने म्हटले आहे की, १९९२ च्या कायद्यानुसार दोषींना सोडण्यात आले आहे. त्याच वर्षी २०२२ मध्ये गृहमंत्रालयाने एकाही बलात्का-याला सोडले जाणार नाही असे सांगितले होते. पण मग गुजरात सरकारने हा आदेश कसा दिला? केंद्राच्या परवानगीशिवाय गुजरात सरकार असे पाऊल उचलू शकेल का?

त्यामुळे महिला या नात्याने आणि एक भारतीय म्हणून, सर्वांत मोठी गर्दी जमवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आणि आपण असे अत्याचार सहन करणार नाही, हे एकत्र येत सांगूया असेही त्या म्हणाल्या आहेत. बिल्किस बानो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत जे घडले त्यानंतर आपण आपल्या भारताला असे करताना पाहू शकत नाही. म्हणूनच आपण सर्व मिळून आवाज उठवू ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन्स असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन म्हणाल्या की, ‘‘आरोपींना माफी नव्हे तर बक्षीस देण्यात आले आहे.

त्यांना पुष्पहार घालण्यात आला आणि मिठाई भरवण्यात आली.’’ ‘‘हे कसं शक्य आहे? गुजरात सरकारने हा आदेश कसा दिला? आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे. महिला आणि भारतीय नागरिक म्हणून आम्हाला हे दाखवून द्यायचे आहे की, हे सहन केले जाऊ शकत नाही,’’ असेही शबाना म्हणाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या