25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्र  मलिक आणि देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव

  मलिक आणि देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव

एकमत ऑनलाईन

मुंबई :अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मात्र ती फेटाळण्यात आली. त्यांच्यासोबतच १०० कोटींच्या गैरव्यवहारात नाव आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील मतदानासाठी कोर्टाचे उंबरठे झिजवत आहेत.

राज्यसभेला मतदान करण्याची संधी गेल्यानंतर आता विधानपरिषदेला मतदान करता यावं, यासाठी दोघांनी याचिका दाखल केली होती. मात्र, सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली. त्यामुळे दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत यावर सुनावणी पार पडणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या