23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रमशिन डोक्यावर पडून चिमुकल्याचा मृत्यू

मशिन डोक्यावर पडून चिमुकल्याचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. फॅब्रिकेशन शॉपमध्ये खेळण्याचा मोह एका सहा वर्षीय चिमुकल्याच्या जिवावर बेतला आहे. पॉलिश मशिनला लोंबकळायला गेला आणि ती मशिनच त्याच्या डोक्यावर पडली.

या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. युवान दौंडकर असे या चिमुकल्याचे नाव होते. या दुर्दैवी घटनेचा व्हीडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पिंपळेगुरव येथील नीता फॅब्रिकेशन शॉपमध्ये ही धक्कादायक घटना काल घडली.

फॅब्रिकेशन शॉपमध्ये खेळण्याचा मोह एका सहा वर्षीय चिमुकल्याच्या जिवावर बेतला आहे. पॉलिश मशिनला लोंबकळायला गेला आणि ती मशिनच त्याच्या डोक्यावर पडली. युवानची आई दुचाकी धुण्यासाठी वॉशिंग सेंटरवर आली होती.

युवान आईसोबत खेळत होता. पण अचानक तो पॉलिश मशिनजवळ गेला आणि लोंबकळू लागला. दुर्दैवाने ती मशिन अधांतरी होती, त्यामुळे ती मशिन युवानच्या डोक्यात पडली. अवघ्या पाच सेकंदात नको ते घडले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या