16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयमहागाईचा दर ७ टक्के पेक्षा कमी राहणार

महागाईचा दर ७ टक्के पेक्षा कमी राहणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आगामी काळात महागाईचा दर ७ टक्क्यांपेक्षा कमी राहिल, अशी शक्यता भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सरकार आणि आरबीआयने महागाई रोखण्यासाठी ६-७ महिन्यांत जी पावले उचलली त्याचा परिणाम सोमवारी जाहीर होणा-या ऑक्टोबरच्या आकड्यांत पाहायला मिळेल. आम्ही महागाई दर ४% पर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महागाई २-६ टक्क्यांच्या आत ठेवण्याचे उद्दिष्ट बदलण्याची गरज नाही. कारण ६% पेक्षा अधिक महागाई दर आर्थिक वृद्धीवर परिणाम करेल. या वर्षी महागाई दर सातत्याने वर राहिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या