26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहागाई नियंत्रणाबाहेरच

महागाई नियंत्रणाबाहेरच

एकमत ऑनलाईन

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ३ दिवसीय पतधोरण आढावा बैठक २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पार पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर पुन्हा ७ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचल्याने आरबीआय रेपो दरात पुन्हा वाढ करण्याची शक्यता आहे. आरबीआय व्याजदरात वाढ करू शकते, असा अंदाज आंतरराष्ट्रीय वित्तीय फर्म मॉर्गन स्टॅनली यांनी व्यक्त केला आहे. आरबीआय रेपो दरात ०.५० टक्क्यांची वाढ करू शकतो. त्यामुळे कर्ज महाग होण्याची शक्यता आहे.

रेपो दरात ३५ बेसिस पॉईंटची वाढ होऊ शकते, असा याआधी आमचा अंदाज होता. मात्र, महागाई दरात होत असलेली वाढ आणि जगभरातील केंद्रीय बँका घेत असलेल्या भूमिका पाहता आरबीआय रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करू शकते, असे मॉर्गन स्टॅनलीने म्हटले आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात १.४० टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचा फटका बँक ग्राहक विशेषत: कर्जदारांना बसला. कारण त्यांच्या ईएमआयच्या रकमेत वाढ झाली. यापुढेही रेपो दरात वाढ झाल्यास त्याचा फटका कर्जदारांना बसू शकतो.

यंदा रेपो दरात पहिल्यांदा मे महिन्यात ४० बेसिस पॉईंट, दुस-यांंदा जून महिन्यात ५० बेसिस पॉईंट आणि ऑगस्ट महिन्यात ०.५० टक्क्यांची वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मॉर्गन स्टॅनलीनुसार खाद्यान्नांच्या महागाईमुळे सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर हा ७.१ टक्के ते ७.४ टक्के इतका राहू शकतो. खाद्यान्नाच्या महागाईत वाढ होत असल्याने महागाई दरात तेजी दिसून येत आहे. कमोडिटीच्या किमतीत वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याने आयात महाग होण्याचा धोका आहे.

फेब्रुवारीपर्यंत होऊ शकते घट
सद्यस्थिती लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलली तर पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत महागाई दरात घट होऊ शकते. जानेवारी-फेब्रुवारी २०२३ या कालावधीत किरकोळ महागाई दर हा ६ टक्क्यांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या