18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रमहाजनांच्या वक्तव्यामुळे परिवाराला अत्यंत वेदना

महाजनांच्या वक्तव्यामुळे परिवाराला अत्यंत वेदना

एकमत ऑनलाईन

सत्तेचा माज आणि मस्ती जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही : खडसे
जळगाव : मंत्री गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केले आहे, ते वक्तव्य म्हणजे रक्षा खडसे यांच्यावर तसेच माझ्या कुटुंबावर संशय व्यक्त करणारे आहे. या वक्तव्यामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्या आहेत आणि अत्यंत दु:ख झाले आहे. पत्नी मंदा खडसे, सून रक्षा खडसे आणि कुटुंबीय तसेच नातेवाईक यांना या वक्तव्यांमुळे मोठा धक्का बसला असून आम्हा सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत, असे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

राजकीय द्वेषातून माणूस किती खाली जावू शकते, याचे उदाहरण म्हणजे महाजन यांचे वक्तव्य आहे. हा सत्तेचा माज आणि मस्ती असून जनता हा माज खाली उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा निशाणा एकनाथ खडसे यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्यावर साधला. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा खून झाला होता की आत्महत्या असे खळबळजनक वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाजन यांच्या या वक्तव्यावर खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या ४० वर्षापासून मी राजकारणात आहे, मात्र एवढ्या घाणेरड्या स्तरावरच राजकारण केले नाही. विषारी टीका करायचो, पण विचार करुन करायचो, एखादा शब्द चुकीचा बोलला गेला तर आम्ही माफी मागायचो. एवढ्या चार वर्षात राजकारणाची पातळी खूप घसरली आहे आणि आता त्याने कळस गाठला. गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळे माझ्या मित्रपरिवारातून फोन येत असून ते तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

चावट शब्द हा खान्देशातील बोलीभाषेतील शब्द आहे. चावट शब्दाचा त्यांनी वेगळा अर्थ काढला. कारण त्यांच्या मनात चांगल्या भावना नसतात. नेहमी इकडे पाहण्याच्या त्यांच्या भावना असतात. मात्र, तरी पण चावट शब्दाचे त्यांना वाईट वाटले असेल, तर मी त्यांची माफी मागावी, त्यांनी मला चावट म्हणावे, मी त्यांची माफी मागायला लावणार नाही, असाही टोला एकनाथ खडसे यांनी यावेळी लगावला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या