29.2 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeराष्ट्रीयमहात्मा गांधींचे आवडते गीत बीटिंग रिट्रिटमधून हटविले

महात्मा गांधींचे आवडते गीत बीटिंग रिट्रिटमधून हटविले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महात्मा गांधींचे आवडत गीत एबाइड विथ मी दरवर्षी २९ जानेवारीला गांधीजींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला बीटिंग रिट्रिट कार्यक्रमात वाजवले जायचे. पण आता हे गीत या कार्यक्रमातून हटविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी सन २०२० मध्ये हे गीत हटविण्यात आले होते. पण याला मोठा विरोध झाल्यानंतर त्याचा पुन्हा २०२१ मध्ये समावेश करण्यात आला होता.
बीटिंग रिट्रिट कार्यक्रमात वाजवल्या जाणा-या २६ धूनमध्ये एबाइट विथ मी या गीताचा समावेश नाही. या गिताला १९५० पासून बीटिंग रिट्रिट कार्यक्रमात प्रत्येक वर्षी वाजवले जात आहे. हे गीत हेन्री फ्रान्सिस लाइट याने लिहिले होते. तसेच संगीत विल्यम हेन्री मॉन्क यांनी दिले होते.

विविध सैन्याचे जवान बँडवर वाजवणार धून
बीटिंग रिट्रीट कार्यक्रमाची सुरुवात सैन्याच्या बँड पथक आणि सहा धूनसह पाइप्स आणि ड्रम बँडद्वारे सुरु केले जाईल. केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांचे बँड तीन धून वाजवतील. यानंतर हवाई दलाच्या बँडद्वारे चार धून वाजवल्या जातील. यामध्ये फ्लाइट लेफ्टनंट एल. एस. रुपचंद्र यांची एक विशेष लढाऊ धूनचादेखील समावेश असतो. यामध्ये नौदलाचा बँड चार धून वाजवतात. त्यानंतर आर्मी मिलिटरी बँड तीन धून वाजवतात. शेवटी मास्ड बँड आणखी तीन धून वाजवतात. यामध्ये कदम कदम बढाएं जा… आणि ऐ मेरे वतन के लोगो…या गितांचा समावेश आहे. या बीटिंग रिट्रिट कार्यक्रमाची सांगता बुगलर्सद्वारे सारे जहां से अच्छा…या गीताने होते. यासंपूर्ण आयोजनात ४४ बुगलर्स, १६ तुरही आणि ७५ ढोलवादकांचा समावेश असतो.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या