नवी दिल्ली : वृत्तसंस्था : चीनी ड्रॅगनच्या वाढत्या कूटनीतिक वेढ्याचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर यंदा आफ्रिका खंडातील ४० देशांच्या लष्करांसोबत एकाच वेळी युद्धाभ्यास करणार आहे. जी-२० देशांच्या शिखर परिषदेदरम्यान ही मोठी लष्करी कवायत होत आहे. त्याच्या बैठकांचे सत्र वर्षभर चालणार आहे.
लष्करी सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, जवळपास १० दिवसांची ही कवायत मार्चअखेर सुरू होईल. ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल. या सरावात भागीदार देशांकडून कमीत कमी १० अधिका-यांच्या तुकड्यांचा समावेश असेल. संयुक्त राष्ट्राच्या सनदीनुसार, श्रेष्ठ सैन्य प्रथांबाबत विविध देशांमधील लष्कर माहितीची आदान प्रदान करतील.
यामध्ये शांतता स्थापनेसाठी नवा यूएन मिशन कायम करणे, मुख्यालय बनवणे, शांतता मोहिमांदरम्यान सैन्य निगराणी साइट तयार करणे, अचानक पेटणा-या युद्धासाठी तत्परता आणि मानवी मदतीच्या उपायांचा समावेश, अशा प्रकारची पहिली कवायत २०१९ मध्ये झाली होती. त्यात १७ देशांनी भाग घेतला होता.
संयुक्त राष्ट्र शांतता संचालन कामकाज समजून घेणे. आफ्रिकी देशांच्या लष्करांसोबत ऑपरेशन्स चालवण्यात नैपुण्य प्राप्त करणे. लष्कराचे अनुभव आफ्रिकी देशांसोबत शेअर करणे, हा या युद्धाभ्यासामागचा उद्देष आहे.