परभणी : नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेने कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी येथे विद्यार्थिनींना अभ्यासाबरोबरच, प्रमाणपत्र कोर्सेस आणि अभ्यासेतर उपक्रमातून शैक्षणिक सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उपक्रमशील महाविद्यालय म्हणून सर्वदूर परिचित या महाविद्यालयाने बदलत्या काळाचा वेध घेत विविध विद्याशाखेच्या निमित्ताने संधीची दालने निर्माण केली. इथे शिक्षण घेणा-या विद्यार्थीनींनी आपले कौशल्य विकसित करीत लोकजीवनात आपली स्वत:ची ओळख निर्माण करावी ,असे आवाहन नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. किरणराव सुभेदार यांनी केले.
कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्रेहसंमेलन कमलोत्सव -२०२२ समारोप प्रसंगी नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष किरणराव सुभेदार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले, उपप्राचार्य, डॉ संगीता आवचार, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सुधीर इंगळे,प्रा.पल्लवी कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. सुभेदार यांचा प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांनी सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ वसंतराव भोसले यांनी केले. तर डॉ.रंिवद्र इंगळे यांनी विभागाचा अहवाल वाचन केले. कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक पातळीवर योगदान देत कार्य करीत आहे.याचा संस्थेच्या व्यवस्थापनाला सार्थ अभिमान वाटतो.
महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत स्वत: सह महाविद्यालयाचे गुणांकन सिद्ध केले आहे.ते सतत वाढत राहील असा आशावाद किरणराव सुभेदार यांनी व्यक्त केला या वेळी विजेत्यां स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आमच्या विद्यार्थिनींनी कमलोत्सवाच्या निमित्ताने आपल्यातील कलागुणांना वाव देत प्रत्येक स्पर्धेत सहभाग नोंदवत हे स्रेहसंमेलन यशस्वी केले. त्याबद्दल कौतुक करित अभ्यासातून ही आपला गुणात्मक दर्जा प्रामाणिक परिश्रमातून सिद्ध करावा असे मत प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पल्लवी कुलकर्णी यांनी केले.आभार ग्रंथपाल संतोष कीर्तनकार यांनी व्यक्त केले.