36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रमहाविद्यालयेदेखील सोमवारी सुरू होणार?

महाविद्यालयेदेखील सोमवारी सुरू होणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्­यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरू करण्यासाठी सरकारने अनुमती दिली आहे. शाळांप्रमाणे राज्­यातील महाविद्यालयेही सुरु करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असून, अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्­यानंतर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु कोरोनाचा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असल्याने सोमवारपासून स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांनाही परवानगी देऊन सुरू करावीत, असा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पाठवला आहे.

१५ ते १८ वयोगटाचे सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी लस घेतली आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याचा विचार सुरु आहे. सोमवारपासून शक्य झाले नाही तरी १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु करणे शक्य आहे. पण वसतिगृहे सुरु करावीत की नाही, याबाबत सरकारमध्येच मतभिन्नता असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या