कोट्टारक्कारा : केरळमधील कोट्टारक्कारा येथील एका रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णानेच महिला डॉक्टरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रुग्णाने २२ वर्षीय महिला डॉक्टरची चाकूने सपासप वार करून हत्या केली.
आरोपी व्यक्तीला कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्यानंतर पोलिस रुग्णालयात घेऊन आले होते. कोट्टारक्कारा पोलिस ठाण्यातील एका अधिका-याने सांगितले की, महिला डॉक्टर जेव्हा आरोपीच्या पायावरील जखमेवर ड्रेसिंग करत होती तेवढ्यात आरोपी चेकाळला आणि त्याने तिथे उपस्थित असलेल्या लोकांवार चाकू आणि कैचीने हल्ला केला.आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.