24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeक्रीडामहिला हॉकी संघाचा थायलंडविरुद्ध विजय

महिला हॉकी संघाचा थायलंडविरुद्ध विजय

एकमत ऑनलाईन

डोन्घा (दक्षिण कोरिया) : ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरच्या ५ गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने आज आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात थायलंडचा १३-० असा दणदणीत पराभव केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर भारतीय हॉकी संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला.

या सामन्यात सविता पुनिया संघाची कर्णधार होती. गुरजीतने सामन्याच्या दुस-याच मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर केले, तर ५ मिनिटांनंतर वंदना कटारियाने दुसरा गोल, पहिल्या क्वॉर्टरच्या अखेरीस भारताचा तिसरा गोल केला, तर गुरजीत आणि ज्योतीने १४ व्या, १५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत ५-० असा विजय मिळविला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या