16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयमाछिल सेक्टरमध्ये हिमस्खलनात ३ जवान शहीद, दोघांची सुटका

माछिल सेक्टरमध्ये हिमस्खलनात ३ जवान शहीद, दोघांची सुटका

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा माछिल भागात शुक्रवारी संध्याकाळी हिमस्खलनाच्या तडाख्यात ३ जवान शहीद झाले. त्याचबरोबर २ जवानांना बर्फाखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही घटना घडली तेव्हा ५६ राष्ट्रीय रायफल्सचे हे पाच जवान नियमित गस्तीवर होते.

कुपवाड्याचे एसएसपी युगल मनहास यांनी या घटनेला दुजोरा दिला मात्र त्यांनी शहीद जवानांची ओळख उघड करण्यास नकार दिला. जवानांचे पार्थिव बर्फातून बाहेर काढण्यात आले आहेत.

नियमित गस्तीदरम्यान हा अपघात
शुक्रवारी संध्याकाळी लष्कराच्या ५६ राष्ट्रीय रायफल्सचे जवान कुपवाडा परिसरातील माछिल भागात नियमित गस्त घालत होते. त्याच वळी अचानक पर्वतांवरून बर्फाचा थर खाली घसरला. बर्फाचा मोठा तुकडा लष्कराच्या जवानांवर पडला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या