18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत अचानक बिघडली असून त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. नितीश नायक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून ते छातीत श्वास घेताना त्रास होत असल्याची तक्रार करत होते. त्यांना ताप आल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे तातडीने त्यांना एम्सच्या केसी एन टॉवरमध्ये भरती करण्यात आले आहे. मनमोहन सिंगांवर उपचारासाठी लगेचच एम्सने एक मेडिकल टीम तयार केली असून या टीमचे एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया नेतृत्व करणार आहेत.

मनमोहन सिंगांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना १९ एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना २९ एप्रिलला सोडण्यात आले होते. आता पाच महिन्यांनी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या