26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमाझ्याच लोकांनी मला दगा दिला

माझ्याच लोकांनी मला दगा दिला

एकमत ऑनलाईन

चुकले असेल तर माफ करा, मुख्यमंत्री भावूक
मुंबई : अडीच वर्षांपूर्वी संकटाच्या काळात तीन वेगवेगळ््या विचारांचे पक्ष एकत्रित आले. महाविकास आघाडीच्या सरकारने खूप चांगले काम केले. लोकांची सेवा केली. यादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून खूप चांगले सहकार्य लाभले. अधिका-यांनी चांगली साथ दिली. पण माझ्याच लोकांनी मला धोका दिला, याचे दु:ख आहे. काही चुकले असेल तर माफ करा, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठकीतून एक्झिट घेतली.

ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरु असताना सलग दुस-या दिवशी कॅबिनेट बैठक पार पडली. या कॅबिनेट बैठकीत तीन नामांतराचे मोठे निर्णय घेण्यात आले. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानताळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतला गेला. ठाकरे सरकारची ही शेवटची कॅबिनेट बैठक असल्याची चर्चा आहे. कारण उद्या सरकारला बहुमताची परीक्षा द्यावी लागणार आहे आणि सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची मानली गेली.

कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावनिक
संकटाच्या काळात तीन वेगवेगळ््या विचारांचे पक्ष एकत्रित आले. महाविकास आघाडीच्या सरकारने खूप चांगलं काम केले. लोकांची सेवा केली. यादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून खूप चांगले सहकार्य लाभले. अधिका-यांनी चांगली साथ दिली. पण माझ्याच लोकांनी मला धोका दिला, याचे दु:ख आहे. काही चुकले असेल तर माफ करा.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या