29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रमानहानीचा खटला, मलिक यांना जामीन

मानहानीचा खटला, मलिक यांना जामीन

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात भाजपच्या मुंबईविभागीय युवक आघाडीचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मलिक यांना जामीन मंजूर केला.

न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मलिक यांना हा जामीन मंजूर केला. कंबोज यांनी दाखल केलेल्या फौजदारी स्वरुपाच्या बदनामीच्या तक्रारीवर न्यायालयाने मलिक यांना नोटीस बजावली होती. गेल्या महिन्यात एनसीबीने क्रूझवर छापा टाकला होता. यानंतर मलिक यांनी माझी आणि माझ्या मेहुण्याची बदनामी केल्याचा आरोप आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या