24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमान्सून १० जूनला कोकणात?

मान्सून १० जूनला कोकणात?

एकमत ऑनलाईन

पुणे : प्रतिकूल स्थितीमुळे र्नैऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रातील प्रवेश सध्या रखडला असला, तरी १० किंवा ११ जूनला दक्षिण कोकणात पूर्वमोसमी पाऊस जोर धरणार आहे. त्यामुळे मोसमी पावसाच्या प्रवेशासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत.

सध्या राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र, अनेक भागांत पावसाळी वातावरण निर्माण होऊन तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणा-या बाष्पयुक्त वा-याचा वेग मंदावला असल्याने गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाचा प्रवास थांबला आहे. अरबी समुद्राच्या बाजूने २९ मे रोजी केरळमध्ये प्रवेश आणि त्यानंतर ३१ मे रोजी कर्नाटकातील कारवारपर्यंत मजल मारलेल्या मोसमी पावसाने गेल्या ८ दिवसांपासून कोणतीही प्रगती केली नाही.

गोव्याच्या सीमेपासून काही अंतरावरच तो थकबला आहे. बंगालच्या उपसागराच्या बाजूनेही त्याची प्रगती गेल्या पाच दिवसांपासून थांबली आहे. सध्या संपूर्ण केरळ, कर्नाटक, तमिळनाडूचा काही भाग, पूर्वोत्तर राज्ये आणि पश्चिम बंगालमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला आहे. या भागात काही प्रमाणात पाऊस होत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांना आता मोसमी पावसाच्या प्रवेशाची प्रतीक्षा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या