28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeमहाराष्ट्रकोटंबी घाटात भीषण अपघात

कोटंबी घाटात भीषण अपघात

एकमत ऑनलाईन

नाशिक : शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गुजरात राज्याकडून मुंबईकडे जाणारा मालवाहतूक ट्रक क्रमांक के. ए ३२ डी. ८३९६ हा कोंटबी घाटातील अवघड नागमोडी वळणावर संरक्षक कठडे तोडुन उलटला. हा अपघात एवढा भयावह होता की, मालट्रकचा सांगाडा पुर्ण वेगळा होवून वाहनाचे दोनभाग झाले. यात वाहन चालक अमरीश शारमता (३२) रा.गुलबर्गा कर्नाटक हा जागीच ठार झाला आहे.

पेठ – नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील कोटंबी घाटातील अवघड व अपघाती वळणावर वारंवार अपघात घडत असून मृत्यूची व जखमींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. महामार्ग प्रशासन याबाबत सुस्त असून या ठिकाणी कोणतीच उपाय योजना करत नसल्याने कोटंबी व परिसरातील नागरिकांत रोषाचे वातावरण असून याबाबत आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते. याबाबत पेठ पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या