37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रमास्कची सक्ती उठवण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा !

मास्कची सक्ती उठवण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा !

एकमत ऑनलाईन

मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये मास्क वापराचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही कदाचित मास्कच्या वापराचे निर्बंध शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मास्कबाबत चर्चा करण्यात आली आहे.या संदर्भात टास्कफोर्सशी चर्चा करण्यात येणार असून टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्कबाबतचे धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जगातील अनेक देशांमध्ये मास्कचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. इंग्लंड, अमेरिका,न्यूझीलंड,हंगेरी या देशांचा त्यात समावेश आहे.ज्या देशांमध्ये वेगाने लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तिथली जनता मास्कच्या निर्बंधातून मुक्त झाली आहे.राज्यात देखील कोरोनाचे संक्रमण हळूहळू कमी होत आहे.तिसरी लाट ज्या वेगाने सुरू झाली ती तितक्याच वेगाने आता ओहोटीला लागल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील मास्कच्या निर्बंधाबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते.

आपल्या देशातही लसीकरण मोहीम मोठया वेगाने सुरू आहे.वेगाने लसीकरण पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.राज्यात आतापर्यंत १४ कोटी ६९ लाख ५७ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे.यात ६ कोटी ३ लाख १२ हजार २४० नागरिकांनी दुसरा तर ८ कोटी ५९ लाख १७ हजार ३७ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.लसीकरणाचा महत्वाचा टप्पा पार केल्यानंतर राज्यातील जनतेचीही मास्कच्या वापरातून सुटका होण्याची शक्यता आहे.ज्या देशांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या देशात लसीकरण झालेल्या जनतेची मास्कच्या वापरातून सुटका करण्यात आली आहे.आपल्याकडेही आता टास्कफोर्सशी चर्चा करण्यात येईल.टास्कफोर्सचा निर्णय आल्यानंतर मास्कबाबतचे धोरण ठरविण्यात येईल असे समजते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या