24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमिग-२१ विमानाला २०२५ पर्यंत निरोप!

मिग-२१ विमानाला २०२५ पर्यंत निरोप!

एकमत ऑनलाईन

वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर विचार
नवी दिल्ली : भारतीय हवाई दल सप्टेंबरमध्ये जुन्या मिग-२१ लढाऊ विमानांच्या उर्वरित चार स्क्वॉड्रनपैकी एक रिटायर करणार आहे. यासोबतच उर्वरित तीन स्क्वॉड्रन पुढील ३ वर्षांत २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने निवृत्त केल्या जातील, अशी माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांकडून समोर आली. गुरुवारी राजस्थानमध्ये मिग-२१ हे दोन आसनी विमान कोसळले होते. या घटनेत या फायटर जेटचे दोन्ही पायलट ठार झाले.

दरम्यान एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर २ महिन्यांत निवृत्त होणारे स्क्वॉड्रन हे श्रीनगरमधील ५१ वे स्क्वॉड्रन आहे, ज्याला स्वॉर्ड आर्म्स असेही म्हणतात. हे तेच स्क्वॉड्रन आहे ज्यामध्ये अभिनंदन वर्धमान हे २०१९ साली विंग कमांडर होते. मिग-२१ बद्दल सांगायचे झाल्यास या विमानांचे अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. भारतातील सर्वात जास्त वेळ सेवा देणा-­या विमानांमध्ये याची गणना केली जाते. अलिकडच्या वर्षांत अनेक मिग-२१ विमाने कोसळली आहेत. म्हणूनच त्याला आता फ्लाइंग कॉफिन असेही म्हणतात.

भारतीय हवाई दलाला हे विमान सोव्हिएत युनियनकडून म्हणजेच रशियाकडून १९६३ साली मिळाले होते. अधिका-यांनी सांगितले की, गेल्या सहा दशकांत ४०० हून अधिक मिग-२१ विमाने कोसळली असून त्यात जवळपास २०० वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला. अपघातांबद्दल बोलायचे झाले तर मिग-२१ इतर कोणत्याही लढाऊ विमानापेक्षा जास्त क्रॅश झाले आहे. मात्र, यामागे हे विमानही उर्वरित विमानांपेक्षा जास्त वेळ सेवा देत आहे, हेदेखील एक कारण आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या